fbpx

नगरच्या सभेत खा गांधींचे भाषण मध्येच थांबवले, नाराज गांधीचे डोळे पाणावले

dilip gandhi

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर लोकसभेचे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे, यावेळी भाजपकडून डावलण्यात आलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी भाषण करत असताना, त्यांना मध्येच थांबण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे भावनिक झालेल्या गांधींचे डोळे पाणावल्याचे चित्र पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर येण्यापूर्वी खा दिलीप गांधी भाषण करत होते, त्यांचे भाषण सुरु असतानाच जिल्हाध्यक्ष बेरड यांनी चिट्ठी देत भाषण थांबवण्यास सांगितले, भाषण थांबवण्यास सांगितल्यावर गांधी भडकले, भाषणात विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन. तसेच विद्यमान खासदार असताना देखील बोलून न दिल्याने ते भावनिक झाले होते.

सुजय विखेंसाठी गांधींना डच्चू

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सुजय यांना उमेदवारी देताना विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे. पक्षाने तिकीट कापल्याने गांधी नाराज आहेत, आज मोदींच्या सभेवेळी घडलेल्या प्रकाराने ते आणखीनच दुखावल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गांधी यांनी नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केल्याच सांगितल आहे.