खासदार दिलीप गांधींसह अन्य चौघांची होणार सीआयडी चौकशी

अहमदनगर: भाजप खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खासदार गांधी यांच्यासह अन्य चौघांची सीआयडी चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे खासदार गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

खासदार गांधी यांनी २०१४ साली बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून इन्डेवर कार खरेदी केली होती. मात्र यानंतर गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात गाडीच्या परफॉर्मन्स बाबत तक्रार केली. या प्रकरणी जून २०१५ साली सुवेंद्र गांधींनी सहकाऱ्यांच्या मदतीने शोरुमधील मॅनेजरचं अपहरण केलं. त्याचबरोबर मारहाण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली.

या प्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार दिलीप गांधी यांच्यासह मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नोव्हेंबर २०१६ला बिहाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, मात्र काहीच आढळून न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे बिहाणी यांनी न्यायालयात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. न्यायालयान या प्रकरणी सबंधीतांवर २४ तासात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

You might also like
Comments
Loading...