fbpx

सत्तेला किंमत देत नाही; शेवटच्या श्वासापर्यत जनतेसाठी काम करणार– खा. उदयनराजे भोसले

udyanraje bhsole

सातारा: काल आज आणि उद्याही जनतेसाठी कर्तव्य म्हणून मी काम करत आहे, या पुढेही करत राहील. तसेच सत्ता असो नसो त्याला फारस महत्वं न देता शेवटच्या श्वासापर्यत जनतेसाठीच काम करणार असल्याचे उदगार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. आज उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यामध्ये जंगी सभेच आयोजन करण्यात आल होत. यावेळी ते बोलत होते.

सातारा येथे आज उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे उदघाटन आणि सभेच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले कि, जनतेच्या प्रेमामुळेच आपल्याला काम करण्याची उर्जा मिळत असून माझ्यासाठी हि जनताच खरी राजा आहे. इतरांप्रमाणे आपल्यामुळे जनता आहे म्हणणाऱ्यांसारखा मी नाही, तर जनतेमुळे मी असल्याचही ते म्हणाले

2 Comments

Click here to post a comment