मराठा क्रांती मोर्चा : शिवसेना खासदाराला आंदोलकांची मारहाण

औरंगाबाद: गंगापूर येथील आंदोलन दरम्यान मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या खा चंद्रकांत खैरे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तसेच संतप्त जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली आहे.

मृत मराठा युवक काकासाहेब शिंदे हे शिवसैनिक असल्याचे खा चंद्रकांत खैरे हे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर गंगापूर येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या :

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती  करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
bagdure

मराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका – धनंजय मुंडे

ठोक मोर्चाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथे धरणे आंदोलन

 

You might also like
Comments
Loading...