परभणीत भाजपचे आमदार-खासदार नसल्याने भाजपकडून परभणीवर अन्याय

शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी भाजपवर डागली तोफ

परभणी : मी शिवसेनेचा खासदार असल्याने भाजप सरकार परभणी जिल्ह्यावर अन्याय करत आहे यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी असणाऱ्या योजनांच्या पॅकेज मधून परभणीला वगळले असल्याचा आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महा जन मोर्चाचे नेतृत्व जाधव यांनी केले.

शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास मोर्चा सुरू झाला झाला. शेतकऱ्यांच्या  प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील अवैध धंदे,व्यापाऱ्यांचे  एलबीटी प्रश्न, महापालिकेने वाढविलेली घरपट्टी, जिल्ह्यातील ठप्प झालेले रोजगार हमी योजनेची कामे अशा विविध समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

खा. बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर झालेल्या सभेतील भाषणात सांगितले कि,शेतकऱ्यांचे  प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्याविरुद्ध हा मोर्चा आहे. राज्य शासनाने विशेष योजनांसाठी पॅकेज जाहीर केले. विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्याला हे पॅकेज देण्यात आले. मात्र, परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. जिल्ह्यात भाजपाचा आमदार, खासदार नसल्याने दुजाभाव केला जात आहे. हे पैसे मिळाले असते तर जिल्ह्यातील ३ हजार वीज जोडण्या सुरु झाल्या असत्या.

जिल्हाभरातील शिवसैैनिक व शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, खा.बंडू जाधव, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, प्रभाकर वाघीकर, संतोष मुरकुटे, राम खराबे, विष्णू मांडे, बाळासाहेब जाधव, अतुल सरोदे, संजय सारणीकर, माणिक पोंढे आदींसह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

You might also like
Comments
Loading...