हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

congress state president ashok chavan

टीम महाराष्ट्र देशा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्याने 6 मे रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात हा शेतकरी 90 टक्के भाजला होता नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या शेतकऱ्याची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

शामराव रामा भोपळे यांनी बँक आणि सेवा सहकारी सोसायटीकडून 17 हजार 360 रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी शासनाकडे कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज केला परंतु या कर्जमाफीस ते अपात्र ठरले. त्यासोबतच अल्प भूधारक असलेल्या या शेतकर्याने आपल्या शेतीत उत्पादीत केलेल्या सोयाबीन, तूर, व हरभरा या तिन्ही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या आत्महत्येस नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असे म्हणून आत्महत्ये केली आहे.

या पार्श्वभूमीवर खा.अशोक चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर प्रहार केला आहे. फसवी कर्जमाफी व शेतीमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे यवतमाळच्या मार्लेगाव येथील शामराव भोपळे यांचा बळी गेला. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार आणखी किती शेतकर्यांाचे बळी घेणार ? असा सवाल केला आहे.