fbpx

खासदार अनिल शिरोळे यांनी चालत केला सिंहगड सर

पुणे : पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी आज सकाळी सिंहगड पायी सर करीत युवक व कार्यकर्त्यांना आपल्या फिटनेसची चुणूक दाखवून दिली. केवळ एक तास १५ मिनिटांत त्यांनी पायथ्यापासून गडाचे हे अंतर पूर्ण केले. स्वत: खासदारांना सिंहगड चढताना पाहून गडावर ट्रेक करण्यासाठी व फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

गडावर चढल्यानंतर खासदार शिरोळे यांनी तेथे फेरफटका मारत नागरिकांशी संवाद देखील साधला. इतकेच नाही तर ‘वृक्षवल्ली’ या सामाजिक संस्थेबरोबर त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत सिंहगडावर साफसफाई देखील केली. पायी चालत आलेले शहराचे खासदार साफसफाई करीत आहेत हे पाहून नागरिकही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.