fbpx

‘मुंबईच्या लोकसंख्येवर नियंत्रन ठेवायला हव’; हेमामालिनींचा मनसेच्या सुरात सूर

hema malini

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली असून मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच आहे. मात्र मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत असल्याच दिसत आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येवर नियंत्रण असायला हव असल्याची प्रतिक्रिया  भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे. त्यामुळे कायम लोंढ्यामुळे मुंबईची बिकट परिस्थिती बनत चालल्याची तक्रार करणाऱ्या मनसेच्या सुरात हेमामालिनी यांनी सूर मिसळल्याच दिसत आहे.

कमलामीलमधील हॉटेल आणि पबला लागलेल्या आगीच्या घटनेत आतापर्यंत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यानंतर आता संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. मात्र यापुढे अशा घटनाघडू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेच आहे.

1 Comment

Click here to post a comment