भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खा. अमर साबळे यांची निवड

मुंबई / नवी दिल्ली : भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष खासदार तरुण विजय यांनी खासदार साबळे यांच्या निवडीची एकमताने घोषणा केली.सदर संस्था ही अखिल भारतीय उद्योजकांची संघटना असणाऱ्या एसोचेमच्या साहाय्याने भारत-आफ्रिका संबंध स्थापन करण्यासाठी एक मंच आहे. आफ्रिका खंडातील 38 देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व व्यापारविषयक संबंध सदृढ करणे या विषयांवर ही संस्था काम करणार आहे.याप्रसंगी काँगोचे सल्लागार मंत्री रॉजर एमॅन्युअल, सेनगलचे पापा म्बेनग्यू, नायजेरचे बौरेमा सौलेमेन, कॉमोरोसचे के.एल. गंजू, चान्सआयचे विटनेस नग्वेनिया, तुनिसियाचे प्रतिनिधी नेजमेद्दीन लाखल हे आफ्रिका खंडातील विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या निवडीबाबात बोलताना खासदार साबळे म्हणाले , भारत नेहमीच आफ्रिकन राष्ट्रांसाठी आधारात्मक हात पुढे करत आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आफ्रिकेतील विविध पायाभूत सुविधांसाठी 10 अब्ज डॉलर कर्जाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री यांच्या गतीमान नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवून भारत-आफ्रिका संबंध अधिक दृढ व मजबूत करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. दोन्ही देशातील जनतेचे जीवनमान, तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समिती निश्चित यशस्वी होईल. लवकरच आफ्रिका खंडातील विविध देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी यांचा पुणे दौरा आयोजित करण्यात येणार आहे. सदर दौऱ्यात ओद्योगिक आणि व्यापार विषयक संधी या विषयावर उद्योजक व आफ्रिकेतून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार साबळे यांनी दिली.

IMP