‘गोलमाल अगेन’ एक्सप्रेस सुसाट

सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला

वेब टीम:‘गोलमाल अगेन’ 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. गोलमाल सीरिजच्या या आगामी सिनेमाने रिलीजपूर्वीच नवा विक्रम केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला आहे.

2006 साली ‘गोलमाल : फन अनलिमिटेड’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2008 साली ‘गोलमाल रिटर्न्स’ हा सिनेमा आला, तर 2010 साली ‘गोलमान 3’ या सिनेमाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. गोलमाल या चित्रपट मालिकेतला पुढचा भाग अर्थात ‘गोलमाल अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून , येत्या दिवाळीत फटाक्यांसोबत हसवण्याची आतिषबाजी करायला ही टीम पुन्हा सज्ज झाली आहे.

गोलमान अगेन’ हा हॉरर-कॉमेडी सिनेमा असून गोलमान सीरिजच्या जुन्या सिनेमांमधील अनेक सीन्स या सिनेमात असण्याची शक्यता आहे. गोलमाल सीरिजचे यापूर्वीचे सिनेमे हिट ठरल्यानंतर आता प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात अजय देवगण, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नीतिन मुकेश यांची मुख्य भूमिका आहे. तर तब्बू आणि परिणीती चोप्रा या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.