राहुल्या-जयडी लवकरच ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : राहुल मगदूम उर्फ ‘लागिर झालं जी’ मालिकेतील राहुल्या आगामी मराठी चित्रपट ‘पळशीची पीटी’ या चित्रपटातून झळकणार आहे. राहुल्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांची आवडती मालिका ‘लागिर झालं जी’ ने निरोप घेतला आहे. तसेच ‘पळशीची पीटी’ या चित्रपटात राहुल्या सोबत ‘जयडी’ उर्फ किरण ढाणे पाहायला मिळणार आहे.

Loading...

‘पळशीची पीटी’ हा चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला  असून चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असणार आहे. साधारण कुटुंबात जन्मलेली ‘भागी’ आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत, नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते कि नाही ?? ती चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे.

दरम्यान हा चित्रपट धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित आहे. आता रुपेरी पडद्यावर राहुल्या आणि जयडी कसा धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या मराठी मनोरंजन क्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत असून २३ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.Loading…


Loading…

Loading...