गुहेत अडकलेल्या ‘त्या’ फुटबाॅलपटूंवर येणार चित्रपट

टीम महाराष्ट्र देशा : थायलंडमधील थाम लुआंग गुहेतून 12 फुटबाॅलपटूंची सूटका करण्यात आली. अनेक दिवस त्यांना वाचवण्यासाठी सुरु असलेली मोहीम आता संपली असली तरी थायलंड आणि जगभरात अजूनही या थरारक घटनेवर चर्चा चालू आहे. या बचावकार्यावर चित्रपट करण्यासाठी दोन कंपन्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रेस्क्यू मोहिमेचा आज शेवट झाला. त्यानंतर, गुहेबाहेर असलेल्या सर्वच मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 8 मुलांना दोन दिवसांमध्ये बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर उर्वरीत 4 मुलांसह प्रशिक्षकासही बाहेर काढण्यात आले. एकंदरीत जगभरातून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने तब्बल 15 दिवसानंतर ही रेस्क्यू मोहीम फत्ते झाली.

जगभरातील विविध देशांनी या मुलांना वाचविण्यासाठी सहकार्य केले आहे. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. इतकेच नव्हे तर अंतराळ उद्योजक एलन मस्कनेही आपल्या मिनिसबचा वापर करुन मदत देऊ केली आहे. या रेस्क्स्यू ऑपरेशनच्या प्रमुखांनी या टीमला संयुक्त राष्ट्र टीम असे नाव दिले होते. विशेष म्हणजे या 12 मुलांसह त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकासही गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील चार विद्यार्थ्यांना रविवारी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर हे ‘मिशन सेव्ह चाईल्ड’ पूर्ण झाले आहे.

अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला होता. आता त्या गुहेजवळच एक वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार असून या मुलांची कशी सूटका झाली हे संग्रहालयातील फोटो आणि वस्तूंमधून दाखवण्यात येईल. या गुहेला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. आता संग्रहालयामुळे आणखी पर्यटकांना आकर्षित करता येईल.

गुहेत अडकलेले फूटबॉलपटू आता थायलंडमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. बचावकार्य करणाऱ्या लोकांनी या मोहिमेचे चित्रिकरण प्रसिद्ध केले आहे. या मुलांना कसे शोधण्यात आले, सर्वप्रथम ही मुले दिसल्यावर काय झाले, नौदलाच्या सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन कसे स्वागत केले जाईल. या सर्वाचे चित्रिकरण झाले आहे. ही गुहा थायलंड आणि म्यानमार यांच्या सीमेवर माए साई या लहानशा गावाजवळ ही गुहा आहे. हा सर्व प्रदेश केवळ पर्यटनावरच अवलंबून आहे. बचावकार्याच्या मोहिमेचे प्रमुख आणि माजी गव्हर्नर नोरोंग्साक ओसोत्तानकोर्न यांनी बचावकार्य कसे करण्यात आले याचा एक कार्यक्रम गुहेजवळ दाखवण्यात येईल असे सांगितले. यापुढे गुहेत आणि गुहेबाहेरही पर्यटकांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात येईल असे थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी स्पष्ट केले आहे.

बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील प्युअर फ्लीक्स स्टुडिओने तेथील मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. या कंपनीचा सहसंस्थापक मायकल स्कॉटने या सर्व मोहिमेला पाहणं ही भावनिक घटना होती असं ट्वीट केलं आहे. प्युअर फ्लीक्सबरोबर लॉस एंजल्स येथील इवानहो पिक्चर्सही या मोहिमेवर चित्रपट काढण्यास उत्सुक आहे.

प्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’

डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेशLoading…
Loading...