‘सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात’; नसीरुद्दीन शाहांचा खुलासा

nasruddin shah

मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या चित्रपटामुळे कमी आणि स्पष्टवक्तेपणामुळे अधिक ओळखले जातात. सध्या ते विविध विषयावर आपले परखडपणे मत मांडतात. मात्र यामुळे त्यांचे अनेकदा कौतुक देखील होते तर अनेकदा यावरून त्याना ट्रोल देखील केले जाते. नुकतेच एका मुलाखतीत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

सरकारकडून अनेक फिल्म मेकर्सना त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहन दिल जातं असल्याचं ते म्हणाले आहेत. एका मुलाखतीत नसीरुद्दीन शहा म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात. तसचं जर ते थेट प्रचार करणारे सिनेमा असतील तर त्यांना क्लीन चीट देण्याचं आश्वासनही सरकारकडून दिलं जातं.” असा खुलासा नसीरुद्दीन शहा यांनी केला.

तसेच नसूरुद्दीन शाह यांनी या कामाची तुलना नाझी जर्मनीसोबत केली. याबाबत ते म्हणाले, “नाझी जर्मनीमध्ये उत्तम सिनेनिर्मिती करणाऱ्या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितलं जात असे माझ्याकडे याचा सबळ पुरावा नाही मात्र सध्या ज्या प्रकारेचे मोठे सिनेमा येत आहेत यावरून आपण अंदाज घेऊ शकतो.” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्त्याव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या :