Movie review : वाचा कसा आहे ‘संजु’ सिनेमा ?

टीम महाराष्ट्र देशा : राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘संजू’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. संजय दत्त हे नाव घेताच डोळ्यासमोर अनेक चित्र उभी राहतात. लोकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सिनेमाच्या माध्यमातून समोर आली आहेत. संजय दत्तच्या आयुष्यात नेमकं काय घडलं याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न हिरानी यांनी केला आहे.

संजय दत्त ची भूमिका रणबीर कपूर अतिशय उत्तमप्रकारे केली आहे. ‘मुन्ना भाई MBBS’,‘लगे रहो मुन्नाभाई’, थ्री इडियट्स आणि पी.के, असे हिट सिनेमा देणारे राजकुमार हिरानी याचा हा सिनेमा ज्यामुळे सगळ्याचं लक्ष या सिनेमा कडे वेधले जाते.राजकुमार हिरानी यांचा सिनेमा म्हणजे सगळ्या सिनेमाचे रेकॉर्ड तोडणारे अशी आपल्याला सवय झाली आहे.

सिनेमाची सुरवात होते ती संजय दत्तच्या पहिला सिनेमा रॉकी पासुन, आणि संजय दत्त ने केलेल्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगाचा आढावा राजकुमार हिरानी यांनी घेतला आहे. सिनेमा संजय दत्त आणि सुनील दत्त वडील-मुलाच्या नात्यावर भर देताना दिसतो. अनुष्का शर्माने या चित्रपटात लेखिकेची भूमिका करताना दिसते. चित्रपट संपल्यानंतर दोन व्यक्तींना तुम्ही कधीही विसरू शकत नाही एक म्हणजे खुद्द रणबीर आणि दुसरा म्हणजे विकी कौशल. संजय दत्तच्या अतिशय जवळच्या मित्राची भूमिका साकारली आहे ती विकी कौशलने.

संजूच्या आयुष्यात आलेल्या टीना मुनीमपासून ते मान्यता दत्तपर्यंतच्या अनेक स्त्रिया त्यांच्यासोबत असलेलं संजयचं नातं हेही तितक्याच नाजुकपणे या चित्रपटातून उलगडलं आहे. दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना या तिघींनीही आपापल्या परिनं भूमिकांना न्याय दिला आहे. परेश रावल यांनी साकारलेला सुनील दत्तही सगळ्याचं लक्ष वेधून घेतो तर मनिषा कोईरालाही नर्गिसच्या भूमिकेत उठुन दिसते.

एके ४७ संजयने दंगलीच्या काळात का बाळगली याच कारणही ऐकण्यासारख आहे. त्यानंतर संजयच्या आयुष्यात आलेले प्रसंग आणि त्यामुळे पूर्णपणे बदललेला संजय दत्त बघायला मिळतो. संजय दत्तची भूमिका करण्यासाठी रणबीर कपूर घेतलेली मेहनत सिनेमा बघताना नक्कीच दिसून येते. संजय दत्तची हुबेहूब नक्कल, त्याच बोलण,चालण यामध्ये रणबीरच्या अभिनायचा कस लागला आहे. जर तुम्ही रणबीर कपूरचे चाहते असल्यास त्याने साकारलेला संजु बघायला सिनेमागृहात नक्कीच जा.

नवाझने दिल्या ‘ड्राय डे’ सिनेमाला शुभेच्छा