अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास झळकणार मोठ्या पडद्यावर

atal-bihari-vajpayee

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ देशातील आणखी एका राजकीय व्यक्तीवर सिनेमा येणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘युगपुरुष अटल’ असं या सिनेमाचं नाव असून मयांक पी श्रीवास्तव हे या सिनेमाचं दिग्दर्शन, तर रंजीत शर्मा हे निर्मिती करणार आहेत.

काल अटल बिहारी वाजपेयी यांचा 93 वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने स्पेक्ट्रम मूव्हीजने ही घोषणा केली.हा सिनेमा वाजपेयींच्या 94 व्या वाढदिनी म्हणजेच 25 डिसेंबर 2018 रोजी रिलीज होणार आहे.या सिनेमाला बप्पी लहरी संगीत देणार असून गाण्यांमध्ये अटलजींच्या कवितांचा समावेश असणार आहे.दरम्यान, या सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका कोण साकारणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.