कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली ; मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

uddhav

मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुक्य्मंत्री उद्धव ठाकरे यांनी जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरु करता येतील का? याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.

दरम्यान आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जी गावे, वाडया, वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच ज्या गावात कोरोना आला परंतु उत्तम नियोजनातून कोरोना मुक्त गाव करण्यात आली अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी या हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

तसेच कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP