‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

दुध आंदोलन

बीड : महायुतीकडून आज राज्यभरात दूध एल्गार आंदोलन करण्यात येत असून बीड जिल्ह्यात देखील शिवसंग्रामकडून ठिकठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसंग्रामच्या वतीने दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे या मागणीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शिवसंग्रामच्या वतीने दुधाचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात महायुतीकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव 10 रुपये लिटरमागे दरवाढ व भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांचा संयमाचा अंत पाहू नये असे प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी म्हंटले.

दूध उत्पादक शेतकऱयांना दुधाचा दर हा खर्च निघण्यापुरता देखील दिला जात नाही. सध्याच्या दरात शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून महायुतीकडून राज्यभरात दूध पिशव्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र तरीही शासनाने त्याची दखल घेतली नसल्याने आज राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामध्ये शिवसंग्राम देखील महायुतीसोबत राज्यभरात आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून दुधाचे वाटप केले. यावेळी दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली. दूध आंदोलकांचा प्रश्न या सरकारला सोडायचा नाही का? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले सरकार असे म्हणत महाविकास आघाडी सत्तारूढ झाली मात्र यांना शेतकऱ्यांचेच काही देणेघेणे आहे कि नाही? शेतकऱ्यांचा अंत या सरकारने पाहू नये व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी म्हंटले आहे.

भाजपचे आजचे दूध आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी-पूजा मोरे

यावेळी सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मीराताई डावकर, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, राजेंदर माने, योगेश शेळके, ज्ञानेश्वर कोकाटे, गणेश साबळे, गणेश मोरे, विनोद कवडे, अश्विन शेळके, अक्षय माने, पंडित माने, हावळे दाजी, सचिन काळकुटे, मछिंद्र कुटे, विजय सुपेकर, बळीराम थापडे, नागोराव बोर्गे, शेसेराव तांबे,हनुमान पवार, सातेराम ढोले, हरीश शिंदे, महादेव बहिर, कल्याण जाणवले, दत्ता गायकवाड, संकेत गुजर, नितीन बुढणर, नवनाथ काशीद, पिनू शिंदे, कुतुबभाई आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या महाविकास आघाडी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना पवित्र गाईचे दूध पाठउन देखील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची आठवन होईना, तोट्यात चाललेला हा दूध व्यवसाय संपवून शेतकऱ्यांना या सरकारला देशोधडीला लावायचे आहे का? दुसऱ्या राज्यांना दूध दर वाढीव द्यायला अडचण होत नाही मग आपल्या राज्यात काय अडचण आहे असा सवाल तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी उपस्थित केला आहे.

बीड शहरात दुधाची नासाडी न करता शिवसंग्रामकडून एल्गार आंदोलनात हलगी वाजवत दुधाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या वाटपास सुरुवात करण्यात अली होती. या निष्ठुर शासनाला या हलगीच्या आक्रोशाने तरी मायेचा पाझर फुटावा व शेतकऱ्यांना वाढीव दूध दर मिळावा अशी अपेक्षा या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.

५ ऑगस्ट आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे तर काळा दिवस!