fbpx

यंत्रमाग कामगारांचा एल्गार : हलगीनाद करत मजुरीवाढीसाठी घेतला मालक संघ कार्यालयाचा ताबा

सोलापूर – (प्रतिनिधी ) – एम आय डी सी येथील यंत्रमागधारक संघ कार्यालय येथे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या नेतृत्वाखाली ५० टक्के मजुरीवाढ व कामगार कायद्याचे लाभ देण्याकरिता एक दिवसीय लाक्षणिक संप १०० टक्के यशस्वी करण्यात आला. कामगारांनी हलगीनाद करून यंत्रमागधारक संघ कार्यालयाचा ताबा घेतला.तब्बल अर्धा तास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना आडम मास्तर म्हणाले की, यंत्रमाग कामगारांना त्यांच्या हंगामी मजुरीत ५० टक्के वाढ करणे क्रमप्राप्त आहे, ज्यावेळी वस्त्रोद्योगावर संकट आले त्यावेळी हाच कामगार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला याचा आपल्याला विसर पडलेला आहे.या कामगाराला माणुसकीच्या नाते मदत करायची दानत नाही, केवळ नफ्यासाठी एखाद्या मुक्या जनावरांप्रमाणे बारा बारा तास राबराब राबवून घेतात. आमचा हा कामगार अशिक्षित,अज्ञान,गरीब मालकाच्या दबावाखाली,दडपणाखाली जगणारा जेव्हा आपला हक्क मागतो तेव्हा आपला उद्योग अडचणीत ,तोट्यात आहे अशी सामुहीक ओरड करता.आणि शासनाकडून भरभरून सवलती,अनुदान लाटता तेव्हाही कामगार आपल्याला अडवत नाही.

पिढ्यांपिढ्या दारिद्रयात जीवन जगत आहेत. ही अन्यायाची,शोषणाची मालिका आता चालणार नाही. कामगार कायदे पायदळी तुडवण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ,प्रशासनाकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मजुरीवाढ बाबत करार संपून दीड वर्षे झालेली आहेत परंतु अद्यापही त्याबाबत चकार शब्द बोलायला तयार नाही,वेळोवेळी मुख्यमंत्री,कामगार मंत्री, सहकार मंत्री,सहा.कामगार आयुक्त,विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा युनियन मार्फत चालू आहे.यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळायला पाहिजे म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे आणि यात कामगारांचाच विजय होईल आणि सर्वोच्च न्यायालयात ही कामगारच जिंकतील असा आशावाद याप्रसंगी व्यक्त केले.

दरम्यान खांद्यावर लाल झेंडा घेऊन शेकडो कामगारांनी यंत्रमागधारक संघ कार्यालयाचा ताबा घेतला.त्याठिकाणी पोलिसांमार्फत मालक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांना पाचारण करण्यात आले .त्यांनी सात दिवसात निर्णय देण्याचे मान्य केले.यावेळी माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर,नसीमा शेख,सिद्धप्पा कलशेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला,शेवंता देशमुख,नलिनीताई कलबुर्गी,सलीम मुल्ला,सलीम पटेल,शरिफा शेख मुरलीधर सुंचू,अशोक बल्ला आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन कॉ अनिल वासम यांनी केले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी किशोर मेहता,बाबू कोकणे,शहाबुद्दीन शेख,मोहन बडगू,श्रीनिवास गड्डाम,वसीम मुल्ला,बापू साबळे,विल्यम ससाणे, रफीक काझी,सनी शेट्टी,मुन्ना कलबुर्गी,हसन शेख,सनातन म्हेत्रे,दाऊद शेख,नरेश दुगाने,जुबेर सगरी,बालकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,अकील शेख,सिद्दीकी इलियास,राजन देशमुख,अफसर शेख,विनायक भैरी,नरेश गुल्लापल्ली, सनी कोंडा,प्रवीण आडम,नागेश म्हेत्रे,बालाजी गुंडे आदींनी प्रयत्न केले.

3 Comments

Click here to post a comment