माथाडी कामगारांचे थकीत पगारासाठी धरणे आंदोलन

माथाडी कामगार

औरंगाबाद : शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचा गेल्या चार महिन्याच्या थकीत पगारासाठी  जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर  ठिय्या  दिला आहे. आंदोलनाचा आज बावीसवा दिवस असून कामगारांचे सर्व प्रश्न समउपचाराने मार्गी न लागल्यास येत्या 20 मार्च पासून गोदमतील सर्व कामे बंद करून आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलन करू असा इशारा कामगारवर्गातर्फे देण्यात आला आहे. कामगारांचा पगार लवकर करावा, शासनआदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्था व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अश्या मागण्या निवेदनात दिल्या आहेत.

यावेळी सुभाष लोमटे , डॉ सुधीर देशमुख , अली खान दाऊद खान व प्रवीण सरकटे आणी कामगारवर्गाची उपस्थिती होती.