fbpx

अभाविप चे विद्यापीठात जयकर ग्रंथालय प्रशासनाविरोधात आंदोलन

पुणे – अभाविप विद्यापीठ शाखेच्या वतीने आज  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले . जयकर ग्रंथालयाच्या नवनियुक्त विभागप्रमुख डॉ.अपर्णा राजेंद्र यांनी अचानक ग्रंथालयाचे वाचन कक्ष वेळापत्रक बदलले असून सकाळी ६ वाजता सुरु होणारे ग्रंथालय ७ वाजता सुरु करावे असा निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे विद्यार्थ्याना नाहक त्रास होत असल्याचा आरोप करत अभाविप केले.

अभाविप कडून विद्यापीठ प्रशासनास ग्रंथालय वाचनकक्ष वेळ पूर्ववत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यन्त सुरू ठेवावी विनंती करण्यात आली होती मात्र  विद्यापीठ प्रशासनाने केराची टोपली दाख़वली. याविरोधात अभाविप विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम क़ंधारे यांनी  ग्रंथालय प्रशासनास भेटून वाचन कक्ष वेळ पूर्ववत करावी अशी मागणी  केली परंतु विभागप्रमुख यांनी निर्णय बदलला नाही त्यामुळे आज अभाविप ने आज आंदोलन केले .तब्बल दीड तास आंदोलन केल्यानंतर विभागप्रमुख डॉ. अपर्णा राजेंद्र या आंदोलनास सामोरे गेल्या .यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री राम सातपूते , विद्यापीठ आंदोलन प्रमुख ऐश्वर्या भणगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.