परंपरेप्रमाणे अर्थसंकल्पा आधी संसदेत हलवा समारंभ !

हलवा समारंभ

नवी दिल्ली : कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्च राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याच मत नुकतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केल होत. त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल सुतोवाच केले होते. सदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर हलवा समारंभाचे आयोजन करण्यात येते. या समारंभानंतर अर्थसंकल्पासंदर्भात काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नॉर्थ ब्लॉक इमारतीत सुमारे दहा दिवस राहतात. अर्थसंकल्पाबाबतची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात येते. अर्थसंकल्प सादर करेपर्यंत त्यांना कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासही परवानगी नसते. या कालावधीत त्यांना जवळच्या व्यक्तींशी फोन अथवा मोबाईल तसेच ई-मेलने संपर्क ठेवता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते. यामागे अर्थसंकल्प गोपनीय ठेवणे हा उद्देश असतो.

हलवा समारंभात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम, केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर, अर्थमंत्रालयाचे सचिव आणि अर्थमंत्रालयातील अधिकारी हे उपस्थित असणार आहेत. दरवर्षी हलवा समारंभ झाल्यानंतर अर्थसंकल्प छपाईसाठी रवाना होत असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. तसेच आर्थिक सर्वेक्षणाचीही छपाई होणार नाही.

तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्;या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

महत्वाच्या बातम्या