औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले तसेच गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातही मोलाची भूमिका बजावलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ(Manohar taksal) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय हो भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
औरंगाबाद मधील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी (दि. ३०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव खोकडपुरा येथील भाकप कार्यलयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बुधवारी १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, विवाहित मुलगी क्रांती, मुलगा अजय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सक्रिय असलेला भाकपचा जिल्हा सहसचिव कॉ. अभय, स्नुषा विद्या व मानसी असा परिवार आहे.
कॉमरेड मनोहर टाकसाळ हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. १०५२ पासून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते. भाकप जिल्हा सचिव ते राष्ट्रीय कौंसिल सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला. महाराष्ट्र राज्य लालबावटा शेजमजूर युनियनद्वारे शेतकर्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक लढे उभारले.
महत्त्वाच्या बातम्या
- अनधिकृत टपऱ्यांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई
- अधिकाऱ्यांचा सत्कार होतच असतो; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आमचे कर्तव्य- आ. दानवे
- Twitter चे सीईओ पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांच्यात नेमकं आहे तरी काय?
- औरंगाबादेत धावताहेत केवळ १-२ बसेस; संप मिटण्याची आशा धूसर..!
- ओबीसी मंत्र्यांमुळे मराठा आरक्षणात खोडा; संभाजी ब्रिगेडचा आरोप
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<