वाहतुकीचे नियम मोडल्यास होणार किमान चार पट तर कमाल दहापट दंड

टीम महाराष्ट्र देशा- मोटार वाहन सुधारणा विधेयकाला काही दुरूस्त्यांसह राज्यसभेनं काल मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूनं १०८ तर विरोधात १२ मते पडली. या विधेयकात राज्यसभेनं काही दुरूस्त्या सुचवल्यामुळे मंजुरीसाठी हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडलं जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास किमान चार पट तर कमाल दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे.

दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रूपये, हेल्मेट नसल्यास १ हजार रूपये तसंच वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास ५ हजार रूपये दंड, अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास गाडी मालकास २५ हजार रूपये दंडासह ३ वर्षे कारावासाची शिक्षा यासह अनेक तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत.

कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसेल तर सध्याचा 100 रुपये दंड थेट 1000 रुपये करण्यात आला आहे.अतिवेगाने गाडी चालवाल तर सध्याच्या 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड भरावा लागेल.याशिवाय वाहतुकीच्या वेळेत तुम्ही रुग्णवाहिकेला जाण्यास जागा दिली नाही तर 10000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

यापुढे ड्रायव्हींग लायसन्ससाठी आधार नंबर सक्तीचा करण्यात आला आहे. सध्या लायसन्स 20 वर्षांसाठी मिळते. हा कालावधी 10 वर्षांवर आणण्यात येणार आहे. वय वर्ष 55 पुढील लोक हे लायसन्स नुतनीकरणासाठी आणतील तेव्हा ते 5 वर्षांसाठीच दिले जाईल.

सर्व राज्यांत वाहन परवाना, वाहन नोंदणी या प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत करण्याची सूचना देण्यात आली आहे. मोटार अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये भरपाई देण्याची तरतूद करण्यात आल्या आहेत. विना पॉलिसी वाहन चालवल्यास 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

सरपंच परिषद भरवत पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्यापासून पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार

केशरी रेशनकार्ड धारकांनासुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा, खा. रक्षा खडसेंची लोकसभेत मागणी

एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम