मोटोरोला कंपनीचा Moto M हा स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली – मंगळवारी मोटोरोला कंपनीने आपला Moto M हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. १५ डिसेंबरपासून हा स्मार्टफोन १५,९९९ रुपयांत फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. Moto M हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो मेटल बॉडीपासून तयार करण्यात आला आहे.

Moto M चे फिचर्स जाणून घ्या 
१) ५.५ इंच असलेली स्क्रीन या Moto M ला आहे
२) तसेच ४ जीबी रॅम Moto M ला देण्यात आली आहे
३) ३२ जीबीची इंटरनल स्टोरेज या Moto M मध्ये असून
४) मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत त्याला वाढवण्याची मूभा आहे
५) तसेच सुपर अमोलेड स्क्रीन आणि गुरिल्ला ग्लास प्रोटेक्शन या Moto M ला देण्यात आलं आहे
६) २.२ गीगाहर्टजचे मीडियाटे हीलियो पी१५ ऑक्टा – कोर प्रोसेसर लावण्यात आला आहे
७) तसेच लेटेस्ट एंड्रायड ओएस ७.१ सोबत बाजारात उपलब्ध आहे
८) १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असून ड्युअल टोन फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे
९) डिवाइजमध्ये ३०५० एमएएचची बॅटरी लावण्यात आली आहे.
१०) तसेच Moto M मध्ये टर्बो चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे
११) स्मार्टफोनवर स्प्लॅश प्रूफ नॅनो कोटिंग देखील लावण्यात आले.