Moto e4 – मोटो ई ४ भारतीय बाजारपेठेत लाँच

मोटोरोलाने आपला मोटो ई ४ हा स्मार्टफोन ८९९९ रूपयात भारतीय बाजारपेठेत आणला असून हे मॉडेल ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

असणार्‍या मोटोरोला मोबॅलिटी कंपनीने भारतात मोटो ई ४ हे मॉडेल लाँच केले आहे. मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवण्यात येते. मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे, याचबरोबर एलईडी फ्लॅश हि देण्यात आला आहे. फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आणि एनएफसी फिचर्स देण्यात आले आहेत. यात ५ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० एचडी क्षमतेचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यात २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. दरम्यान, मोटोरोला लवकरच भारतात मोटो ई ४ प्लस हे मॉडेलदेखील लाँच करणार असल्याचे समजते.

https://www.youtube.com/watch?v=l-Dqwcw1SdoLoading…
Loading...