आई करीनाला वाटते की तैमुरने करावे ‘या’ क्षेत्रात करिअर

blank

टीम महाराष्ट्र देशा : पतौडी घराण्याचे छोटे नवाब तैमुर आली खान हा स्टार कीड त्याच्या फोटोमुळे,व्हिडिओमुळे आणि त्याचा बालकलांमुळे सतत चर्चेत असतो. आता परत एकदा माता करीनाच्या एका विधानामुळे तो चर्चेत आला आहे. तैमुरने आजोबा मन्सूर अली खान यांच्या पावलांवर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात उतरावे अशी इच्छा करीना कपूर हिने व्यक्त केली.

मी जरी पडद्यावर चमकत असेल तरी तैमुर ने तेच करावे असे नाही. तैमुरने क्रिकेट खेळलेले मला आवडेल, असे करीनाने एका डान्स शो दरम्यान सांंगितले. भारताचे विश्वकरंडक विजेते कपिल देव आणि करीना कपूर बोलत असताना जेव्हा करीनाच्या इच्छचे बाबत त्यांना समजले तेव्हा त्यांनी तैमुर ला एक बॅट स्वाक्षरी करून भेट दिली.

तैमुर हा आता फक्त २ वर्षाचा आहे. तरी तो खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या फोटो ला भरपूर लाईक मिळतात. त्याची नेहमीच चर्चा सगळीकडेच सुरु असते. मध्यंतरी तैमुर चे टीम इंडिया च्या जर्सी मधले फोटो खूप वायरल झाले होते. त्या फोटोची सर्वांनी प्रशंसा केली होती. हा एक लहान बालक असला तरी त्याचे सोशल मिडीयावर अकाउंट आहे आणि त्याला फाॅलोवर्स भरपूर आहेत.