सासुला सून तर सासऱ्याला जावई वरचढ

grampanchyat elecation 2018

औरंगाबाद : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही मजेशीर लढत पाहायला मिळाल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावई विरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली होती. यात सुनेने सासुला तर जावयाने सासऱ्याला पराभूत केल्याचे निकालाअंती स्पष्ट झालेय.

धोंधलगावात शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सूनाने आणि सासऱ्याच्या विरोधात जावयाने निवडून येण्याचं दावा केला होता. मात्र अंतिम निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, कन्नडच्या पिशोरमध्ये महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला. पर्यायाने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणारे हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनाही मोठा धक्का बसला आहे. पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला 17 पैकी 4 जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल 9 जागांवर विजय मिळवला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.

महत्वाच्या बातम्या