आईनेच रचला दहा दिवसाच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव ; स्वतच दिले होते मुलीला नदीत फेकून

baby kidnapped pune

पुणे : पुण्यात काल झालेल्या १० दिवसांच्या मुलीच्या अपहरण नाट्याला आता नवीनच वळण मिळाल आहे. त्या मुलीचे अपहरण झाले नसून आईनेच बाळ  नदीत टाकल्याच समोर आल आहे. रिक्षातून ढकलून देवून आपल्या दहा दिवसाच्या बाळाच अपहरण झाल्याचा दावा रेश्मा शेख या महिलेन केला होता

दरम्यान रेश्मा शेख हिने दिलेली माहिती गोंधळात टाकणारी असल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. यानंतर आता आपणच बाळ सांगवीच्या पुलावरून मुळा नदीपात्रात फेकल्याची कबुली रेश्मा शेखने दिली आहे. याप्रकरणी महिलेची चौकशी सुरु असून पोलिसांकडून बाळाचा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित बातमी आईच्या हातातून पळवले दहा दिवसांचे बाळ; पुण्यात भरदिवसा धक्कादायक प्रकार