एका मुक्या जीवासाठी थांबली मुंबईची लाईफ लाईन.

वेबटीम-     अस बोलल जात की मुंबई कोणासाठी थांबत नाही. मुंबईत प्रत्येक जण धावत असतो. मुंबईच्या लाईफ लाईन ने काल एका मुक्या जीवाला जीवदान दिले.  कुत्र्यांचा जीव वाचविण्यासाठी चक्क धावती लोकल थांबवण्यात आल्याची  घटना मुंबई घडली आहे .गर्दीने गजबजलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भर दुपारी लोकल लोहमार्गा वरून धावत होती.लोकल धावत असताना अचानक रेल्वे ट्रॅकवर कुत्रा आला.

bagdure

उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी काही क्षण आपला श्वास रोखून धरला.इतर प्राण्यांप्रमाणे यांचा  देखील जीव जाणार.प्रत्येकाच्या मनात त्या कुत्र्याला वाचविण्याची इच्छा होती.पण सिग्नल हिरवा होता कोणत्याही क्षणी लोकल येऊ शकत होती  .त्यामुळे कोणीही ट्रॅकवर उतरण्याचे धाडस करत नव्हते.तितक्यात लोकल आली, ती लोकल कुत्र्याच्या जवळ पोचणार अगदी त्या क्षणाला मोटारमॅन ने प्रसंगावधान दाखवत धावती लोकल थांबवली.आणि पाहत असलेल्या प्रत्येकाच्या जीवात जीव आला. त्या कुत्र्याचा जीव वाचला होता.तितक्यात एका मुलाने ट्रॅककडे धाव घेतली आणि त्या कुत्र्याला बाजूला घेतले. कुत्र्याचे जीव वाचविणाऱ्या मोटरमॅन चे, नाव आर पी मीणा असे आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...