‘शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अश्या CAA-NRCला राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही मंडळी मोठ्याप्रमाणावर विरोध करत आहेत. मात्र आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) हात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

CAA-NRCला उत्तर-प्रदेशमध्ये मोठा विरोध झाला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी मोठा हिंसाचार घडवून आणला होता. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, ज्या भागांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाशी पीएफआयचा थेट संबंध असल्याचं ईडीच्या अहवालातून समोर आलं आहे.

Loading...

एका बाजूला ही धक्कादायक माहिती समोर येत असताना दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत असं वादग्रस्त विधान सिन्हा यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात