संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न केले आणि या प्रयत्नाना यश आले आहे. संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला असल्याचही त्यांनी सांगितले. संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात तयार झाला. असल्याचही त्यांनी सांंगीतलंं.

औद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत शहरी असो किंवा ग्रामीण राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा. त्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ, असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले म्हणाले.

गोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस