बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात : कोळसे-पाटील

blank

पुणे : वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात असा आरोप आता कोळसे-पाटलांनी केला आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो, असा आरोपही त्यांनी केला.

भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप असणाऱ्या कोळसे-पाटलांना महाविद्यालयात का बोलावले असा जाब विचारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोरदार विरोध केला.

कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने चीडलेल्या कोळसे पाटलांनी संघ आणि न्यायमूर्तींवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले.

नेमकं काय म्हणाले कोळसे-पाटील ?

नागरिकाला हव्या त्या गोष्टी करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. अशावेळी भाषणे करायला परवानगी रद्द करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो.फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने परवानगी नाकारण्याचे काय कारण ? हे महाविद्यालय टिळकांनी काढले असून त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती. याच टिळक आणि त्यांच्या शिष्यांनी कट करून छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गात बॉम्ब टाकला होता. तरी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली. शिरोळेंनी महाविद्यालयासाठी जमीन दिली. त्या फर्ग्युसन महाविद्यालयात भाषण न करू देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी आहे.