विराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला !

कोलंबो:  येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या दिवशी आर अश्विन, वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर श्रीलंकेकडून रंगाना हेराथने ४ तर कसोटी पदार्पण केलेल्या पुष्पाकुमाराने २ विकेट्स घेतल्या आहेत.

विराट कोहली जरी पहिल्या डावात अपयशी ठरला असला तरी एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने जबदस्त कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने डावात तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी विराटपेक्षा दुप्पट सामने नेतृत्व केलेल्या कर्णधारांसुद्धा जमलेले नाही.

६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ५ वेळा करण्यासाठी गांगुली (४९ कसोटी), एमएस धोनी (६० कसोटी), बॉर्डर (९३ कसोटी) आणि ग्रॅमी स्मिथ (१०९ कसोटी ) एवढे सामने नेतृत्व करावे लागले आहेत. तर विराट कोहलीने केवळ २८ कसोटीमध्ये ६वेळा हा विक्रम केला आहे.