धक्कादायक : प्रदूषण करणारे सर्वाधिक ५  हजार ३०६ उद्योग पुणे विभागात

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील प्रदूषण करणाऱ्या एकूण उद्योगांपैकी धोकादायक विभागातील सर्वाधिक म्हणजे ५ हजार ३०६ उद्योग पुणे विभागात असून त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर धोकादायक कचऱ्याचीही निर्मिती होत असल्याचं २०१८-१९ च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान सर्वाधिक धोकादायक विभागातील उद्योग तीन महिन्यात बंद करावेत असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सहाय्यानं या उद्योगांकडून गेल्या पाच वर्षांची नुकसान भरपाई वसूल करावी. ही नुकसान भरपाई ठरवताना या उद्योगांमुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि प्रदूषण प्रतिबंधक घटकांना होणारं नुकसान लक्षात घ्यावं असं हरित लवादानं म्हटलं आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक आणि कोल्हापूरचा क्रमांक लागतो.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’