KKR च्या  कर्णधार पदावरून मॉर्गनची हकालपट्टी, तर…

KKR च्या  कर्णधार पदावरून मॉर्गनची हकालपट्टी, तर…

Eoin Morgan

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) नेतृत्व करणारा कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) लीगच्या पुढील मालिकेपूर्वी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास तयार आहे. केकेआर मॉर्गनला कायम ठेवण्याच्या मनस्थितीत नाही आणि अशा परिस्थितीत त्याला केकेआरकडून आयपीएल 2022 मध्ये खेळणे कठीण जात आहे.

मॉर्गनच्या खराब फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनाने त्याला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे आणि कोलकाता नाइट रायडर्सने मॉर्गनला कायम न ठेवण्याच्या निर्णयाची माहितीही दिली आहे.

KKR च्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, मॉर्गनचा फलंदाजीचा फॉर्म आयपीएल 2021 मध्ये एक मोठी चिंता होती. त्याचा आयपीएल मधील फॉर्म पाहत इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारावर मोठी रक्कम खर्च करण्यास फ्रेंचायझी तयार नाही, असे सूत्राने सांगितले आहे. जर KKR संघ व्यवस्थापनाने मॉर्गनला कायम ठेवले नाही तर IPL 2022 मध्ये संघात नवा कर्णधार दिसू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या फिरकीपटूंना संघात कायम ठेवले जाऊ शकते. त्याच्याशिवाय पॅट कमिन्सला कायम ठेवता येईल. त्याचबरोबर आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांच्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

IPL 2022 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. बीसीसीआयने मुख्य भागधारकांना अंतर्गत माहिती दिली आहे की 2 एप्रिल ही स्पर्धा सुरू होण्याची संभाव्य तारीख आहे. यावेळी 10 संघ खेळणार असून एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या