fbpx

पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात : तरुण सागर

वेबटीम : आपल्या प्रवचनांतून सडेतोड भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तरुण सागर यांनी भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना चांगलंच फटकारले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात आहेत, असं विधान त्यांनी केलं असून या  वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरसह देशभरात अनेक ठिकाणी काही लोकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या,याचाच समाचार राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील पिपराली येथील वैदिक आश्रमात बोलताना घेतला.

काय म्हणाले नक्की जैन मुनी तरुण सागर 

पाकिस्तानात जितकी दहशतवाद्यांची संख्या नाही, त्याहून अधिक गद्दार आपल्या भारतात आहेत. देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात ते गद्दार नाहीत तर काय आहेत, असा सवालही त्यांनी केला. दहशतवादी वाघासारखं समोरुन वार करत नाहीत. ते लांडग्यासारखे पाठीत वार करतात. आपल्या प्रवचनांमध्ये कटुता नसते. तर ती कटुता आपला समाज आणि लोकांमधील संबंधांमध्ये मिसळली आहे. त्यामुळंच माझी प्रवचने कटू वाटतात, असंही ते म्हणाले.