यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत

टीम महाराष्ट्र देशा – गरीबाची थट्टा कशाला करता? १२ कोटींच्या महाराष्ट्रात १८००० लोकांनाच जेवण. तर नांदेडमध्ये फक्त ५०० लोकांना. यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत. अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’ उपक्रमावर टीका केली. ते नांदेड येथे बोलत होते.

काल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजना सुरु झाली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या या योजनेत रोज १८००० अनुदानित थाळ्यांच वाटप होणार असून प्रत्येक उपहार गृहाला ठराविक कोटा देण्यात आला आहे. समाजातील गरीब लोकांना हि थाळी फक्त १० रुपयात मिळणार आहे.

Loading...

 

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप ला बाजूला सरत शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हा पासून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. कालच सुरु झालेल्या योजनेवर लगेच दुसर्या दिवशी टीका करत भाजपने आपली विरोधी पक्षाची भूमिका पुन्हा पार पडली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात