81 लाखापेक्षा अधिक आधारकार्ड ब्लॉक !

नवी : केंद्र सरकारने आतापर्यत 81 लाखापेक्षा अधिक नागरिकांचे आधारकार्ड बंद केले आहेत. ‘आधार’ प्राधिकरणाकडून हा निर्णय़ घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आधार कायद्यातील कलम 27 आणि 28 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री पी.पी.चौधरी यांनी अलीकडेच राज्यसभेत दिली होती .