औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले असून, चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच ज्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविले आहेत, त्यांना अहवाल येईपर्यंत हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून दोन लाख ५० हजार ॲन्टीजेन तर एक लाख ५० हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या तयारीसंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, पुन्हा किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यासोबतच ज्या कोविड सेंटरच्या जागा महापालिकेने परत केल्या आहेत. त्यांना देखील पुन्हा पत्र दिले जाणार आहे. सुमारे ३०० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत. ३९ हजार ॲन्टीजेन तर ११ हजार आरटीपीसीआर किट महापालिकेकडे उपलब्ध आहेत. गरज पडल्यास शासनाकडून कीट प्राप्त होतील. मंगल कार्यालयांसह, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ५० च्या वर गर्दी असू नये, असा नियम असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
घाटीतून घेणार रेमडेसिव्हर : महापालिकेकडे सध्या ५० रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहेत. घाटी रुग्णालयातून आणखी एक हजार इंजेक्शन मागविले जाणार आहेत. अतिगंभीर रुग्णांसाठी रेडिमिसिव्हर इंजेक्शनची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राठोड पोहरादेवीला रवाना; पूजा चव्हाण प्रकरणात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
- संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाजासोबत शिवसेना पक्षही उभा ?
- ‘मामी रॉक्स’ म्हणत इंधनदरवाढी वरून अभिनेत्याचा अर्थमंत्री सीतारमण यांना टोला
- कृतिबध्द आराखडा तयार करून गावाला विकासाचा आकार द्या: अर्जून खोतकर
- पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय ? उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण