नोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर – मोदी

नोटाबंदीनंतर देशभरात तीन लाख कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद आढळले असून, ३७ हजारांपेक्षा अधिक बनावट कंपन्या समोर आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल सनदी लेखापाल दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी, बेकायदा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.

2013 साली काळ्या पैशांमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यावर म्हणजेच 2014 मध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील काळ्या पैशांत 45 टक्क्यांची घट झाली आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

जीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक नवी सुरुवात आहे. सीए हे अर्थजगतातील एक स्तंभ आणि अर्थजगतातील ऋषीमुनी आहेत. त्यांच्यावर अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे.