पुणे शहरासह ग्रामीण भागातील 20 लाखांहून अधिक नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचितच

corona

पुणे – पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 20 लाख 33 हजार 395 नागरिकांना अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रासुद्धा मिळू शकलेली नाही. शहर आणि जिल्ह्यात अठरा वर्षे वयापुढील एकंदर 85 लाख 39 हजार 706 नागरिक आहेत.

दरम्यान, यापैकी आतापर्यंत 65 लाख 06 हजार 311 जणांना पहिली मात्रा मिळाली आहे. त्यातील 39 लाख 31 हजार 652 नागरिकांना दुसरी मात्रा मिळणं बाकी आहे. हे लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याला आणखी किमान 79 लाख 98 हजार 442 मात्रा लागणार आहेत.

दरम्यान, राज्यात गेले 4 दिवस सातत्यानं कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या 4 हजाराच्या आत असली तरी कालची संख्या परवापेक्षा जास्तच होती. आणि संख्या कमी जास्त होत असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण अडीच टक्क्यांच्या आसपास कायम आहे. राज्यात काल 3 हजार 530 नवे कोरोनाबाधित आढळले आणि 3 हजार 385 कोविड रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या 49 हजार 671 झाली आहे. राज्यात काल कोविड-19 च्या 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

महत्त्वाच्या बातम्या