महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी एक लाखाहून अधिक घरे मंजूर

नवी दिल्ली : केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आज महाराष्ट्रातील शहरी गरीबांसाठी 1 लाख 1 हजार 220 घरे मंजूर केली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 लाख 30 हजार 220 घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज झालेल्या 43 व्या बैठकीत देशात एकूण 5 लाख 60 हजार 695 घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

Loading...

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 43 व्या बैठकीत महाराष्ट्रासह (1,01,220), उत्तरप्रदेश (1,79,215), आंध्र प्रदेश (1,10,618), कर्नाटक (48,729), मध्य प्रदेश (26,587), गुजरात (25,861), मणिपूर (13,715), तामिळनाडू (12,174), बिहार (10,084), ओडिशा (7,472), छत्तीसगड (7,067), केरळ(4,194) हरियाणा (4,019 ), राजस्थान (3,601), झारखंड (2,165) , आसाम (1,419), मेघालय (1,397) आणि पाँडेचेरी (1,158) अशी एकूण 5 लाख 60 हजार 695 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

या बैठकीत एकूण 33 हजार 873 कोटी खर्चाच्या 1 हजार 243 प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 8,404 कोटींचा सहायता निधी मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता 79 लाख 4 हजार 674 घरांना मंजुरी दिली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?