२०१८ मध्ये उडणार राजकीय धुराळा; नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमध्ये थेट सामना.

मोदी

टीम महाराष्ट्र देशा : २०१७ वर्ष सरल आणि आता २०१८ सुरु झाल आहे. खरतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांसाठी चालू म्हणजे २०१८ वर्ष खूप महत्वाच आहे. २०१७ हे वर्ष विरोधी पक्षांसाठी लाभदायी ठरलेलं आहे. विशेषतः सरत्या वर्षाच्या शेवटी महत्वाच्या असलेल्या गुजरातच्या निवडणुका झाल्या त्यानंतर निकाल देखील काँग्रेस साठी चांगला ठरला.

खरतर २०१७ हे वर्ष भाजपसाठी देखील यश देणार ठरलं आहे. त्यामुळे २०१८ मध्ये देखील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सर्व निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी २०१८ हे वर्ष सेमी लोकसभेचे रणांगण असणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांचे लोकसभा निवडणुकांवर कश्या पद्धतीने परिणाम होणार हे देखील येत्या काळात पाहन महत्वाच असेल. त्याअनुषंगाने नव वर्षात कोणत्या कोणत्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घालत्या आहेत पाहा सविस्तर…..

Loading...

मध्य प्रदेश
सध्या राज्य सरकारवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे नवे नवे आरोप होत आहेत. त्यामुळे 2003पासून सत्तेत असलेल्या भाजपला हे राज्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शिवराजसिग चौहान हे तिसऱ्यांदा गड जिंकणार का हे पाहन महत्वाच असले.

कर्नाटक
महत्वाच असलेल्या कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारला पाडण्यासाठी अमित शहा यांनी आतापासूनच प्रचार सुरु केला आहे. निवडणुकीला अद्याप बराच कालावधी शिल्लक असला तरी भाजपने बी.एस.येडीयुरप्पा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे.

राजस्थान
मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष दिसत असल्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. राहुल ब्रिगेडमधील सचिन पायलट यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पायलट कश्या पद्धतीने मास्टर गेम खेळतील यावर या राज्यातील कॉंग्रेसच भवितव्य अवलंबून असेल.

मेघालय
राज्यात सध्या मुकुल संगमाकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या रोवेल लिंगदोह यांच्यासह 5 आमदारांनी राजीनामा दिला आहे. इतक नव्हे तर युनायटेड डेमोक्रेटिक पक्षाच्या एका आणि दोन अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले आहे. एकूणच निवडणुकीच्या आधी राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

छत्तीसगड
या राज्यात देखील 2003 पासून भाजपा सत्तेत आहे. रमण सिंह गेली 3 टर्म मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यावेळेस कॉंग्रेस भाजपविरोधात कश्या पद्धतीने प्रचार करेल आणि छत्तीसगड वर आपल वर्चस्व स्थापन करेल हे पाहन महत्वाच असेल.

त्रिपुरा
गेल्या 25 वर्षांपासून माकपची सत्ता आहे. भाजपने आसामचे भाजपचे नेते हेमंत बिश्वसरमा यांना त्रिपुराजी जबाबदारी सोपवली आहे. यावेळी मात्र राज्यातील माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मदत मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक माकपसाठी प्रतिष्ठेची असणार हे निश्चित आहे.

नागालँड
राज्यात सध्या एनडीएने समर्थन दिलेले सरकार आहे. 2013मध्ये एनसीपीचे चार आमदार भाजपमध्ये आल्याने त्यांनी टी.आर.जेलियांग यांच्या नेतृत्वाखालील नागालँड पिपल्स फ्रंटला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळेच भाजपने राज्यात पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.

मिझोरम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर ईशान्यकडील राज्यांमध्ये विशेष लक्ष दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींनी येथे हायड्रोपॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले होते. या राज्यातील काँग्रेसची सत्ता येणाऱ्या विधानसभा निडवणुकीत हाती घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'