fbpx

कॉंग्रेसपेक्षा आम्हीच दिला राज्यांना अधिक निधी -नरेंद्र मोदी

Niti Ayaog Meeting 17 June 2018

सह्याद्री वृत्त सेवा / भा.वृ.सं. : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने राज्यांना यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे ११ लाख कोटी रूपयांचा निधी दिला आहे. ही रक्कम युपीए सरकारच्या अखेरच्या आर्थिक वर्षातील तरतूदीपेक्षा ६ लाख कोटींनी अधिक आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या चौथ्या बैठकीचे आयोजन रविवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी सर्व राज्यांचे मुख्यमंञी आणि निती आयोगाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पूवोत्तर राज्यांचा विकास, सॉईल हेल्थ कार्ड, राज्यांचा आणि देशाचा विकास दर, इत्यादी महत्वाच्या विषयांवर सादरीकरणर करण्यात आले.

तसेच आयुष्यमान भारत, राष्ट्रीय पोषण अभियान, मिशन इंद्रधनूष सारख्या विषयांवर देखील प्रशासकीय परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली.