fbpx

गडचिरोलीच्या सी -60 जवानांचा धडाका : 48 तासात आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांचा खात्मा

gadhchiroli

टीम महाराष्ट्र देशा- भारताच्या इतिहासातलं नक्षलवाद्यांच्या विरोधातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं आहे. गेल्या 48 तासात आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. सोमवारी गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

सुरक्षा दलाची धडाकेबाज कामगिरी सुरूच असून गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठं ऑपरेशन पार पाडत काल, राजाराम खानाला परिसरात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडलं. महत्त्वाचं म्हणजे, या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आलं.

गेल्या दोन दशकातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई यशस्वी पार पडल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या सुपरडूपर हिट गाण्यावर ताल धरत एकच जल्लोष साजरा केला. त्या आधी पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर ‘सैराट’ चित्रपटातील गाण्यावर जवानांनी ताल धरला होता.