एल्फिस्टन पूल दुर्घटना मोर्चा प्रकरणी `मनसे’ आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबई : एल्फिस्टन पूल दुर्घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आयोजकांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  २९ सप्टेंबर रोजी एल्फिस्टन रोड पूल दुर्घटनेत २३ जणांचा निष्पाप बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. यामध्ये रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट स्थानक दरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला जमावबंदी नियमाखाली पोलिसांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही. असे असले तरी मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी आयोजकांसह मनसेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.