छत्रपतींच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ उद्या औरंगाबादमध्ये होणारा मोर्चा रद्द

aurangabad

औरंगाबाद प्रतिनिधी ;डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ  उद्या होणारा प्रस्तावित मोर्चा रद्द करण्यात आला आहे.कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मराठा संघटनांकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.विशेष म्हणजे कुलगुरूनी सर्व मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या आहेत.

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून चांगलंच तापल आहे. छत्रपतींच्या पुतळ्याला काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे तर काही संघटना पुतळा उभारण्याच्या बाजूने उभ्या राहिल्या आहे .राजकीय तसेच विविध संघटनांचा हस्तक्षेप विद्यापीठाच्या कारभारात वाढल्याच चित्र आहे . उद्या मराठा समाजातील काही संघटना तसेच पुतळा उभारण्याचा बाजूने असणाऱ्या संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच कुलगुरूंनी लेखी आश्वासन दिल आहे ज्यात छत्रपतींचा पुतळा उभारण्याची मागणी मान्य केली असून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याचं निलंबन मागे घेण्यात येत असल्याच्या मागण्यांचा समावेश आहे . असं जरी असलं तरी कुलगुरूंची आजपर्यंतच्या कारकीर्दीचा विचार केला तर ते आपल्या लेखी आश्वासनांवर कितपत ठाम राहतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र देशाने विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे जाणून घेतलं तेव्हा विद्यार्थ्यांना विद्यापीठात पुतळ्यावरून केवळ राजकारण सुरु असल्याचं मत व्यक्त केल. विद्यापीठात पुतळा उभारण्याला विद्यार्थ्यांचा फारसा विरोध नसल्याच चर्चेतून समोर आल . तसेच कुलगुरू म्हणून डॉ.बी,ए,चोपडे यांच्याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली होती .