Share

Morbi Bridge | मोरबी पूल पडला की पाडला?, तरुणांची मस्ती अनेकांच्या जीवावर बेतली, पाहा व्हिडीओ

Morbi Bridge | गांधीनगर : गुजरात (Gujrat) येथील राजकोटमधील मोरबी (Morbi Bridge) भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमवला, काहींना तर आपली चिमुकली पिल्ले देखील गमावली. मात्र, हा पूल अचानक कोसळलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये तरुणांची मस्ती अनेकांच्या जीवावर बेतल्याचं स्पष्ट दिसत आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये काही तरुण पूल मद्दाम हलवताना दिसत आहेत. याच दरम्यान, पूल देखील कोसळला आणि सर्व जण क्षणात खाली कोसळले. रुणांनी पूल हलवल्याने हा पूल पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तपासातूनच या पूल पडण्यामागचं सत्य बाहेर येणार आहे.

पुलावर 300-400 लोक उपस्थित होते. पूल तुटल्यानंतर काही लोकांनी पुलाचा भाग आणि दोरी घट्ट पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

मोरबी पूल (Morbi Bridge) व्हिडीओ :

दरम्यान, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे.

राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी दिली आहे. कुंडारिया यांच्या बहिणीच्या दिराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंडारिया रविवारपासून मोरबीयेथेच तळ ठोकून बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Morbi Bridge | गांधीनगर : गुजरात (Gujrat) येथील राजकोटमधील मोरबी (Morbi Bridge) भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. …

पुढे वाचा

Marathi News Video

Join WhatsApp

Join Now