१३ वर्षांनी मूडीजने सुधारली भारताची रॅंकिंग

modi

नवी दिल्ली : अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत मात्र विरोधकांकडून या निर्णयांचा विरोध केला जात आहे असं असलं तरीही जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत.

मूडीज इन्वेस्टर सर्विसेस ही संस्था मूडीज् म्हणूनच ओळखळी जाते. ही संस्था जगातील विविध अर्थव्यवस्थांवर आणि त्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यानुसार प्रत्येक अर्थव्यवस्थेचं मानांकन करते. मूडीजने दिलेलं मानांकन अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह मानलं जातं.आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं.मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग एका अंकाने वाढवलं आहे. आतापर्यंत भारताचा समावेश BAA-3 या श्रेणीत होता, आता तो BAA-2 श्रेणीत करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भारताची पत वाढली आहे.विशेष म्हणजे विरोधक नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर मोदीवर सरकारवर सातत्याने टीका करत असताना, मूडीजने आता त्याचंच कौतुक केलं आहे.

Loading...

एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे.BAA3 रेटिंगचा अर्थ म्हणजे सर्वात कमी गुंतवणुकीची स्थिती असणं. म्हणजेच आता मूडीजनुसार भारतात गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं आहे. यामुळे रेटिंग BAA3 ने वाढवून BAA2 केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार