fbpx

महाराष्ट्रात मान्सून यंदा ३ दिवस लांबणीवर

टीम महाराष्ट्र देशा : स्कायमेट या हवामान खात्याची माहिती देणाऱ्या संस्थेनुसार यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन ३ दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून उशिरा दाखल होणार आहे.

१ जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा ४ जूनला केरळच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन १० जून नंतर होईल, परंतु राज्यात मान्सूनमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सक्रीय होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजाला जुलैपर्यंत पावसाची वाट पहावी लागणार आहे. तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस होईल अशी शक्यता आहे. त्यामध्ये ५ टक्के कमी किंवा अधिक पाऊस होऊ शकतो असा स्कायमेटचा अंदाज आहे.

दरम्यान, भारतीय हवामान संस्थेने अद्याप हवामानाचे अंदाज घोषित केलेले नाहीत, त्यामुळे या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.